इंदापूर मधील “दादा’ चा ७ तारखेला शरदचंद्रजी पवार पक्षात प्रवेश..?
इंदापूर,दि.३
- गेली कित्येक महिने इंदापूरच्या राजकारणात दररोज नवनवीन घटना घडत राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यातच एक इंदापूर शहरातून मोठी बातमी समोर येत असून इंदापूर मधील दादा ७ तारखेला शरदचंद्रजी पवार या पक्षामध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
इंदापूर मध्ये राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. प्रत्येक पक्षाने वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना आपल्याशी करण्यासाठी डावपेच आखले आहेत. कोण निष्ठेमुळे तर कोण विचाराने प्रेरित होऊन वेगवेगळ्या पक्षांमध्ये प्रवेश करण्यासाठी तयार झाले आहेत. आताच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंदापूर मध्ये वकिली या क्षेत्रामध्ये नावलौकिक असलेले व दादा या नावाने ओळख असलेले सतत सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले “दादा’ ७ तारखेला शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह पक्ष प्रवेश करणार आहेत.
इंदापूर शहरात हळूहळू शरदचंद्रजी पवार पक्षाची ताकद वाढण्यास सुरुवात झाली आहे. सामाजिक जीवनात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सतत संघर्ष करणारे व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून राज्यसह देशभर महत्त्वाच्या पदांवरती काम केलेले दादा थेट शरदचंद्रजी पवार या पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे हजारो समर्थक शक्ती प्रदर्शन करत पक्षप्रवेश करणार असून पक्षप्रवेशाचे ठिकाण अजून निश्चित नसले तरी तो पक्षप्रवेश पुण्यामध्ये होणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.