महाराष्ट्र

इंदापूर तालुक्यात काँग्रेस कडून चलो पंचायत, चलो वार्ड अभियानाला सुरुवात.

तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल बंडगर यांची माहिती.

इंदापूर,दि.२९

  • इंदापूर विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने इंदापूर युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल बंडगर यांनी आज इंदापूर येथे चलो पंचायत, चलो वार्ड आणि लाडकी बहीण योजना, नवीन मतदार नोंदणी अभियान राबविण्यात संदर्भात बैठक आयोजित केली होती. यावेळी बैठकीत युवक काँग्रेस पदाधिकारी यांना संबंधित योजना जास्तीत जास्त गरजू पर्यंत योजना पोहचाव्या अश्या सूचना केल्या.

यावेळी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मा.वीरधवल गाडे, प्रदेश सचिव दिलीपसिंह देशमुख, इंदापूर विधानसभा अध्यक्ष मा. अमोल बंडगर, पुणे जिल्हा कॉग्रेस कमिटी सरचिटणीस जकीर काझी, इंदापूर शहराध्यक्ष. सुफीयान जमादार, श्रीनिवास पाटील, नईम शेख, युवराज गायकवाड, अजित बंडगर, पांडुरंग चितळकर, नाना बंडगर, प्रदिप बंडगर,आकाश राऊत यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!