विशेष

बायोसीड ९७९२ मका बियाण्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ.

इंदापूर मध्ये मका बियाणे विक्रेत्यांचा पार पाडला स्नेह मेळावा.

इंदापूर,दि.१८

  • सध्या राज्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची पिकाला लागणाऱ्या पाण्याची चिंता मिटली आहे. त्यातच राज्यात सध्या बायोसीड ९७९२ या मका बियाण्याची प्रचंड चर्चा असून या मका वाणापासून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये दुपटीने वाढ झाली असून मार्केटमध्ये बायोसीड ९७९२ या मका बियाण्याला मका उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रचंड मागणी वाढल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

राज्यामध्ये सध्या मका या पिकाच्या लागवडीचा हंगाम सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्र सह मराठवाडा, विदर्भ व खानदेशामध्ये मोठ्या प्रमाणात मका पिकाचे उत्पन्न घेतले जाते. त्यातच अधिक उत्पादन देणाऱ्या मका बियांच्या वाणाला बाजारात अधिक मागणी असते. सध्या राज्यातील मार्केटमध्ये बायोसीड ९७९२ या मका वाणाला अधिक मागणी असून या वाणामुळे शेतकऱ्यांच्या वैयक्तिक जीवनात उन्नती झाल्याचे दिसून येत आहे. ज्या-ज्या शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये बायोसीड ९७९२ या मका बियाण्याची लागवड केली आहे. त्या त्या शेतकऱ्याला आपल्या उत्पन्नामध्ये दुपटीने वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

बायोसीड ९७९२ हे मका बियाणे श्रीराम बायोसीड जेनेस्टिक या कंपनीचे असून हे एक सिंगल क्रॉस हायब्रीड मका बियाणे आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारच्या जमिनीत तितक्याच जोमाने शेवटपर्यंत कणसांमध्ये मक्याचे दाणे भरून वजनाने जास्त व साठवण क्षमता अधिक असलेले हे संशोधनानंतर कंपनीने शेतकऱ्यांसाठी बाजारात आणलेले एकमेव बियाणे आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे मका बियाणे म्हणून बायोसीड ९७९२ ची खासियत आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या हवामान तज्ञ म्हणून जगप्रसिद्ध असलेले पंजाबराव डक यांनाही या मका बियाणे भुरळ घातली आहे. पंजाबराव डक यांनीही ९७९२ हे शेतकऱ्यांमध्ये क्रांती घडवणारे मका बियाणे असल्याचे म्हटले आहे.

नुकताच इंदापूर तालुक्यातील बायोसीड ९७९२ या मका बियाण्याच्या वाणाची विक्री करणारे विक्रेते व डिस्ट्रीब्यूटर यांचा स्नेह मेळावा स्वामीराज हॉटेल या ठिकाणी पार पाडला.

या मेळाव्याला श्रीराम बायोसीड जेनेस्टिक या कंपनीचे रिजनल मॅनेजर भारत पोद्दार, टेरेटरी मॅनेजर वैभव वाघ, टेरेटरी मॅनेजर अमोल थिटे, प्रतिनिधी दिलीप पाटोळे, सुमित बोराटे व तुकाराम मगर यांनी बायोसीड ९७९२ या मका बियाण्याचे प्रात्यक्षिक दाखवत अधिक उत्पन्न घेतलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान केला. व इंदापूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवासहित विक्रेत्यांना या बियाण्याची आपल्या शेतात लागवड करण्याची विनंती केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!