Uncategorized

भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुका उपाध्यक्षपदी अंकुश दोरकर तर चिटणीस पदी गणेश पोळ यांची निवड.

इंदापूर,दि.६

  • भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुका पूर्व मंडळ कार्यकारणी मध्ये तालुका उपाध्यक्षपदी (पूर्व) वकीलवस्ती ग्रामपंचायतचे माजी सदस्य, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष अंकुश दोरकर यांची तर चिटणीस पदी भाटनिमगाव गावचे माजी सरपंच गणेश पोळ यांची निवड करण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टी पूर्व मंडळ तालुका अध्यक्ष राम आसबे यांनी दोरकर व पोळ यांची निवड झाल्याचे पत्र दिले आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देशाचा व राज्याचा विकास सुरू आहे, भारतीय जनता पक्ष सर्व घटकांना सोबत घेऊन काम करत असल्याने भविष्यात इंदापूर तालुक्यात संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार आहे.

अंकुश दोरकर (भा.ज.प. उपाध्यक्ष-इंदापूर तालुका)

भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष शेखर वढणे,महामंत्री आकाश कांबळे, तालुका अध्यक्ष राम आसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व मंडल मध्ये संघटना वाढीसाठी तसेच भारतीय जनता पार्टीचे विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी काम करू.

यावेळी अंकुश दोरकर व गणेश पोळ यांची निवड झाल्यानंतर वकीलवस्ती व भाटनिमगाव येथे त्यांच्या समर्थकांनी फटाक्याच्या आतषबाजीत आनंद उत्सव साजरा केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!