इंदापूरमध्ये शहांची लाट! घर टू घर प्रचारात भरतशेठ शहा आघाडीवर.

इंदापूर,दि २४
- इंदापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरतशेठ शहा यांनी घर-घर प्रचार मोहीमेत प्रचंड आघाडी घेतली आहे. इंदापूर शहरातील दहा ही प्रभागांना पिंजून काढत, प्रत्येक नागरिकांच्या दारात जाऊन संवाद साधण्याचा त्यांचा उपक्रम शहरात चर्चेचा विषय बनला आहे.
निष्कलंक, स्वच्छ प्रतिमा व सर्वसमावेशक नेतृत्वासाठी ओळखले जाणारे भरतशेठ शहा हे नागरिकांच्या अपेक्षांना अत्यंत बारकाईने ऐकून घेत असून त्यांच्या प्रत्येक भेटीस जनतेकडून मोठ्या उत्साहात स्वागत मिळत आहे. विविध वयोगटातील नागरिक, महिला, युवा, व्यावसायिक वर्ग यांनी शहांच्या भोवती मोठी गर्दी करत सार्वजनिक पाठिंबा दर्शविला.
भरतशेठ शहा यांच्या प्रचार मोहिमेस आणखी गती मिळाली आहे कारण त्यांच्या सोबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि ज्येष्ठ नेते आप्पासाहेब जगदाळे हेही मैदानात उतरले असून त्यांच्या सभा व बैठकींनाही प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. शहांचा अनुभव, भरणे यांची विकासदृष्टी आणि जगदाळे यांचा संघटनात्मक प्रभाव यामुळे अजित पवार गटाची तिकडी इंदापूरमध्ये जोरदार हवा निर्माण करत आहे.
शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “इंदापूरच्या विकासासाठी पारदर्शक, कर्तृत्ववान आणि स्वच्छ नेतृत्व हवे—आणि ते भरतशेठ शहांच्या रूपात दिसते.”
संपूर्ण इंदापूरभर सुरू असलेल्या उत्स्फूर्त वातावरणामुळे भरतशेठ शहा यांच्या बाजूने प्रचंड सकारात्मक लाट निर्माण झाली असून त्यांच्या घर-घर मोहिमेला मिळालेला अप्रतिम प्रतिसाद आगामी निवडणुकीचे चित्र बदलू शकणारा ठरत आहे.



