इंदापूर,दि.३०
- इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील बँक ऑफ बडोदा या बँकेच्या व्यवस्थापकाला लोणी येथे पाच लोकांनी अडवून मारहाण केल्याची घटना घडली आहे. सदर व्यक्तींच्या विरोधात इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि.३० रोजी लोणी देवकर येथे बँक ऑफ बडोदा या शाखेचे काम आटोपल्या बँक व्यवस्थापक मनोज बाळासाहेब भोसले, रा. फिनिक्स अपार्टमेंट पळसदेव हे गणेश किसन कडाकणे व महेश कुमार अय्यर यांच्यासोबत नेहमीप्रमाणे वेगवेगळ्या मोटरसायकल वरून घरी जात असताना पूर्वीचा वाद मनामध्ये ठेवून सागर थोरात या व्यक्तीने साथीदारांसह पाठीमागून येऊन मारहाण केल्याची घटना घडली आहे.
सदर बँक व्यवस्थापक मनोज भोसले व त्यांचे सहकारी घाबरून पाठीमागे वळाले असताना त्यांना लोणी देवकर येथील शिवाजी चौकात आल्यानंतर सागर थोरात, निखिल थोरात, सुरज थोरात, शुभम थोरात, महेश थोरात यांनी मोटार सायकल वरून खाली उतरवून लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच गणेश कडाकणे यांना सागर थोरात व इतर साथीदारांनी लाकडी काठीने पायावर व पाठीत मारहाण करत डोक्यामध्ये लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे फिर्यादी मध्ये नमूद केले आहे. तसेच गणेश कडाकणे यांना मारतो व जाळतो अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.