विशेष

इंदापूर च्या महामार्ग पोलीस केंद्राच्या सहाय्यक निरीक्षक पदी सोमनाथ पडळकर रूजू.

महामार्गावरील पालखी स्थळांना दिल्या भेटी.

इंदापूर,दि १८

  • महामार्ग सुरक्षा पथकाचे,महामार्ग पोलीस केंद्र,इंदापूर च्या प्रभारी अधिकारी म्हणून,सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर नुकतेच रुजू झाले असून,महामार्ग सुरक्षा पथक अलर्ट मोडवर आले आहे.तसेच पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांच्या दळणवळणासाठी सर्व खबरदारी,व पालखी स्थळांना भेटी,महामार्ग सुरक्षा पथकाचे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्या असून,महामार्ग सुरक्षा शाखेशी,नागरिकांना वाहतुकीसाठी काही अडचणी असल्यास संपर्क साधावा.असे आवाहन करण्यात आले आहे.

यासंदर्भात माहिती देताना,पोलीस निरीक्षक प्रज्ञा देशमुख व सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर म्हणाले,पंढरपूर वारीसाठी वारकरी बांधव,दिंड्या,पालखी सोहळे महामार्गावरून जात असतात.कोणत्याही वारकरी बांधवांना दळणवळणाचा,कुठेही त्रास होऊ नये. यासाठी महामार्ग सुरक्षा पथक काम करणारा असून,वारी कालावधीत 24 तास पेट्रोलिंग असणार आहे.

बारामती ते इंदापूर व इंदापूर शहर ते अकलूज हद्दीच्या दरम्यान,संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा मार्ग आहे. प्रत्येक विसाव्याच्या व मुक्कामी ठिकाणी महामार्ग सुरक्षा पथकाकडून भेटी दिल्या असून,स्थानिक नागरिकांची,गावकऱ्यांची संवाद साधण्यांत आला आहे.आषाढी वारीच्या निमित्ताने,नागरिकांनी वारकरी बंधूंना सेवा सुविधा देऊन,पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.असेही आवाहन,पोलीस निरीक्षक प्रज्ञा देशमुख व सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर यांनी केले आहे.

रस्ता सुरक्षा सप्ताहात इंदापूर तालुक्यात जनजागृती करण्यासाठी,गावागावातील शाळा माध्यमिक विद्यालय,कॉलेज तसेच चालक,वाहकांना रस्ते वाहतुकीचे नियम तंतोतंत पालन करण्यासाठी मार्गदर्शन, करण्यात येत आहे.वारी कालावधीत पालखी सोहळ्यातील वाहनांना तसेच मानाच्या पालख्या ज्या मार्गावरून जातात.यांची पथकरातून शासनाच्या माध्यमातून सूट देण्यात आलेली आहे. असे शासन परिपत्रक जाहीर झाले आहे त्यामुळे यंदाची वारी वारकऱ्यांसाठी लाभदायक असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!