
पुणे,दि.१७
- शहर पोलिस दलातील परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांची पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांची पदोन्नतीने पुणे शहर पोलीस दलात अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी शहर पोलीस दलातील परिमंडळ एकचे उपायुक्त संदीपसिंह गिल्ल यांची नियुक्ती केली आहे. पुण्यात काम करताना गिल्ल हे ‘दबंग’ अधिकारी म्हणून ओळखले जात होते.
गणेशोत्सवात त्यांनी केलेले कामकाज कौतुकास्पद होते.त्यासोबत त्यांनी म्हत्वाचे गुन्हे आणि आंदोलन हे यशस्वीरित्या हाताळले आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी उपायुक्त संदीपसिंग गिल यांच्या बदलीचा आदेश शनिवारी दिला आहे.



