Uncategorizedराजकीय

अमोलराजे इंगळे यांनी जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणूक लढवावी युवकांकडून अमोलराजे इंगळे यांना साद.

इंदापूर,दि.४

  • इंदापूर तालुक्यातील वडापुरी काटी जिल्हा परिषद मतदार संघातून युवा नेते अमोलराजे इंगळे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या गटाकडून निवडणूक लढवावी असा आग्रह गटातील तरुण व युवा मतदारांकडून होत आहे.

२०१७ साली झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत अमोलराजे इंगळे हे तत्कालीन काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते मात्र त्यावेळी त्यांना योग्य वेळी संधी देऊ असा शब्द देण्यात आला होता. गेली दोन-तीन वर्ष निवडणुका लांबल्याने अनेक इच्छुकांना मात्र वेट अँड वॉच या भूमिकेत राहावे लागले, परंतु होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी युवा नेते अमोलराजे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

इंदापूर तालुक्यात इंगळे यांना मानणारा एक मोठा युवक वर्ग आहे, त्याचबरोबर ते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. कोविड काळात इंगळे यांनी लोकोपयोगी कामे केले असून रक्तदान शिबिरे जयंती उत्सव सांस्कृतिक कार्यक्रम याचबरोबर विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत.

सध्याचे राजकारण युवकांभोवती फिरत असून अमोलराजे इंगळे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे.जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीसाठी इंगळे यांना संधी मिळावी अशी मागणी आता मोठ्या प्रमाणात पुढे येऊ लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!