इंदापूर तालुका संभाजी ब्रिगेडचे अध्यक्षपदी अक्षय चव्हाण यांची निवड.

इंदापूर,दि.२०
- समाजकारण व संघटनात्मक कामात अग्रेसर असलेल्या अक्षय चव्हाण यांची इंदापूर तालुका संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अलीकडेच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी तालुका व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
अक्षय चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून युवकांना संघटित करण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील आहेत. संभाजी ब्रिगेडच्या विविध उपक्रमांतून त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.
या निवडीबद्दल तालुका व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, आगामी काळात संघटनेचे कार्य अधिक जोमाने व व्यापक पातळीवर होईल, असा विश्वास व्यक्त केला. अक्षय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक प्रश्नांवर प्रभावीपणे लढा दिला जाईल आणि युवकांना योग्य दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या वेळी पुणे जिल्हा अध्यक्ष विनोद जगताप, सोबत मराठा सेवा संघ पुणे जिल्हाध्यक्ष राहुल घोगरे, बारामती तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड तुषार तुपे, श्रीनिवास शेळके, मराठा सेवा संघ इंदापूर शहर अध्यक्ष अमोल खराडे,सरपंच औदुंबर कचरे, बापू धुमाळ, सचिन बेसरे, आप्पासो लोखंडे, संकेत जगताप सह आदी उपस्थित होते.



