विशेष

अग्निशस्त्र दारुगोळा जवळ बाळगल्या प्रकरणी नृसिंहपुर मधील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल.

इंदापूर,दि.२४

  • इंदापूर तालुक्यातील नृसिंहपुर येथील एका व्यक्तीने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्याकडील आदेशाचे उल्लंघन करून कोणतेही परवानगी नसताना स्वतःजवळ अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदापूर तालुक्यातील नृसिंहपुर येथील आरोपी राहुल दिलीप धोत्रे याने स्वतःजवळ असलेल्या रेनॉल्ट कंपनीच्या डस्टर मोटार कार क्रमांक -एम एच १३,सीके २०२४ मध्ये कोणतीही परवानगी नसताना एक पांढऱ्या रंगाची लोखंडी पत्र्याची गावठी बनावटीची पिस्टल मॅक्झिन, त्यामध्ये ३ जिवंत पितळी बुलेट हे अग्निशस्त्र जवळ बाळगले होते. संबंधित व्यक्तीने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्याकडील आदेशाचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद पोलीस हवालदार जगनाथ रामचंद्र कळसाईत यांनी दिली आहे.

इंदापूर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये संबंधित आरोपीकडून १) कि.अं. १०० /- रूपये पांढ-या रंगाची लोखंडी पत्राची गावठी बनावटीची पीस्टलची मॅक्झीन, २) किं. अं.६००/- रूपये किंमतीचे ३ जिवंत पितळी बुलेट (अग्नीशस्त्र दारूगोळा) त्यावर इंग्रजीत (KF.19.9MM2Z) असे लिहलेले, ३) कि.अं १०,००,०००/- रूपये किंमतीची पांढ-या रंगाची रेनॉल्ट कंपणीची डस्टर मोटार कार क्रमांक एम.एच-१३-सी.के-२०२४ असा एकूण १०,००,७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!