अजित पवारांकडून पहिल्या विधानसभा उमेदवाराची घोषणा.
दिलीप मोहिते पाटलांना निवडून द्या मी त्यांना मंत्री करतो.
इंदापूर,दि.१२
- महायुतीचे जागावाटप अद्याप झालेले नाही मात्र अजित पवारांनी आज जाहीर सभेत दिलीप मोहिते पाटलांची अप्रत्यक्ष उमेदवारी जाहीर केली. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून कार्यसम्राट आमदार दिलीप मोहिते पाटील यांना पुन्हा निवडून द्या, त्यांना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी देतो, अशी जाहीर घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच्या भाषणात केली.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील चाकण परिसरात पार पडला. या मेळाव्याला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. याबरोबर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थ्यांची देखील कार्यक्रमाला उपस्थिती होती.
दिलीप मोहिते पाटलांची अप्रत्यक्ष उमेदवारी जाहीर..
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीत जागा वाटपाच्या चर्चांना सुरूवात झाली आहे. अजून कोणती जागा कुणाला जाणार, याचे सूत्र ठरलेले नाही. विद्यमान कार्यक्रमाट आमदारांना पुन्हा संधी द्यावी, याकडे कल आहे. त्यानुसार विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांना पुन्हा संधी द्यावी, अशी जनतेची इच्छा असल्याचे अजित पवार म्हणाले.
दिलीप मोहिते पाटील यांना मी विधानसभेला पुनश्च संधी दिल्यावर त्यांना बहुमतांनी निवडून द्या.आमदारकीच्या पुढे त्यांची गाडी गेलेली नाही. त्यांची गाडी लाल दिव्यापर्यंत पोहोचावी, अशी येथील जनतेची इच्छा आहे. ती इच्छा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन, अशी घोषणाच अजित पवारांनी केली.