सामाजिक
निमसाखर येथे प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा.
इंदापूर, दि २९
- इंदापूर तालुक्यातील निमसाखर गावातील पानसरे मळा येथे ग्रामस्थांच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या भगवान बाबा मंदिराचे बांधकाम नुकतेच पुर्ण झाले असून आज मंदिरात भगवान बाबांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने निमसाखर सह आजूबाजूच्या गावातील असंख्य नागरिकांनी येऊन आवर्जून देवदर्शन घेतले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने निमसाखर येथे आलेल्या माजी बांधकाम आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे श्री प्रविणभैय्या माने यांनी मनोभावे देवदर्शन घेऊन उपस्थित नागरिकांशी संवाद साधला, तसेच आपल्या वैयक्तीक निधीतून २५ हजार रुपये रक्कम मंदिरासाठी देणगी स्वरूपात दिली.
यावेळी शेखर पानसरे, प्रविण घोळवे, सचिन पानसरे, विक्रम चौधरी, सोनू पानसरे, अक्षय पानसरे, पांडुरंग पानसरे, सतीश पानसरे, तानाजी पानसरे, सागर पानसरे, पोपट पानसरे, संतोष पानसरे, सोनू चौधरी, नितीन पानसरे, लक्ष्मण पानसरे, adv. आशितोष भोसले, नागेश गायकवाड हे यावेळी उपस्थित होते.