इंदापूर,दि.१६
साखरेची एमएसपी (किमान विक्री किंमत) लवकरच४ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल होणार आहे. याबाबत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याबरोबर दिल्लीत बैठक झाली असून, केंद्रीय मंत्रिमंडळात निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील (harshvardhan patil) यांनी दिली आहे.
क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या काही वर्षापासून ऊसाची केवळ एफआरपीच (Sugercane FRP) वाढत आहे. असे असताना त्या तुलनेत साखरेचे दर मात्र वाढत नाहीत. यामुळे साखर कारखान्यांना मिळणारी तफावतीची रक्कम अत्यंत तुटपुंजी असल्याने कारखानदारी अडचणीत येत आहे. यामुळे साखर उद्योग वाचवायचा असेलतर साखरेचे किमान मूल्य प्रति क्विंटल ४ हजार २०० रुपये करण्यात यावे अशी मागणी ५२४ सहकारी साखर कारखान्यांनी केलीय. तसा प्रस्ताव देखील केंद्रीय मंत्री मंडळासमोर आहे. लवकरच याला मंजुरी मिळेल असे देखील सहकारी साखर कारखाना संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
ऊसाचा एफआरपी वाढत असताना त्या तुलनेत साखरेचे दर वाढत नाहीत. यामुळे साखर कारखान्यांना मिळणारी तफावतीची रक्कम तुटपुंजी असल्याने कारखानदारी अडचणीत येत आहे. सहकारी साखर कारखानदारीवर बरेच घटक अवलंबून असून रोजगारक्षम व्यवसाय आहे. यामुळे साखर उद्योग वाचवायचा असेल तर साखरेचे किमान मूल्य प्रति क्विंटल ४२०० रुपये करण्यात यावे अशी मागणी ५२४ सहकारी साख कारखान्याच्या राष्ट्रीय संघाने केली आहे. हा प्रस्ताव आता केंद्रिय मंत्रीमंडळासमोर आहे. लवकरच याला मंजुरी मिळेल, असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले.