आबा निंबाळकर इंदापूर काँग्रेसचे अध्यक्ष झाले अन् काँग्रेस संपली..?
जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष च्या मनमाणीमुळे चांगले कार्यकर्ते पक्ष सोडून गेले.
इंदापूर,दि.१४
- इंदापूर तालुक्यात काँग्रेस पक्ष अखेरची घटका मोजत आहे. कारण इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपदी आबा निंबाळकर यांची निवड झाल्यानंतर चांगले कार्यकर्ते पक्षाला सोडून गेले आहेत. त्यामुळे आता इंदापुरात केवळ तालुका अध्यक्ष हेच एकमेव काँग्रेस पक्षात राहिले आहेत. केवळ जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांच्या मनमानी कारभारामुळे तालुका काँग्रेस भुईसपाट झाला आहे.
राज्यामध्ये व देशामध्ये काँग्रेस पक्षाला चांगले वातावरण असताना इंदापूर तालुक्यात मात्र जिल्हा अध्यक्षांच्या मनमानी कारभाराने व तालुकाध्यक्षांच्या लहरीपणामुळे काँग्रेस पक्ष संपून गेला आहे. स्वप्निल सावंत यांनी उरलीसुरली काँग्रेस एकत्रित आणून टिकून ठेवण्याचे काम केले होते. मात्र पक्षांतर्गत गटबाजी व वरिष्ठांचे दुर्लक्ष या कारणाने सावंत यांनी पक्षाला रामराम ठोकत हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत घरोबा केला.
त्यानंतर काँग्रेसमध्ये चांगले काम करणारे कार्यकर्ते बिभिषण लोखंडे, महादेव लोंढे, युवराज मामा पोळ, निवास शेळके, तानाजी भोंग या प्रमाणिकपणे काँग्रेस पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे काम तालुका अध्यक्ष आबा निंबाळकर यांच्या सांगण्यावरून जिल्हाध्यक्षांनी केल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे. यानंतर या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आणि त्याच ठिकाणी पक्षाच्या वाढीला ब्रेक लागला.
सध्या इंदापुरात काँग्रेस असून नसल्यासारखी झाली आहे त्यामुळे इंदापूर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आबा निंबाळकर हे दुसऱ्याच्या हातातील बाहुले बनल्याची चर्चा जुन्या कार्यकर्त्यांच्या तोंडून ऐकण्यास मिळत आहे.
बिभीषण लोखंडे, महादेव लोंढे यांच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते पक्षात राहिले असते तर इंदापुरात काँग्रेस पक्ष मोठ्या ताकतीने व झपाट्याने वाढला असता. परंतु जातीचे कार्ड खेळत तालुकाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांनी अशा निष्ठावंत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्ष सोडण्यास भाग पाडल्याचे बोलले जात आहे.