अंकिता पाटील ठाकरे यांचे उपस्थितीमध्ये बावडा व शेळगाव येथे उद्या कार्यक्रम.
इंदापूर,दि.९
पुणे जिल्हा परिषदेच्या मा.सदस्या अंकिताताई पाटील ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बावडा (ता. इंदापूर) येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी निःशुल्क नोंदणीचा शुभारंभ बुधवारी (दि. १०) सकाळी ९ वा. आणि शेळगाव (ता. इंदापूर) येथे वैदवाडी येथील महालक्ष्मी मंदिरासमोर सभागृह बांधकामाचा भूमिपूजन समारंभ सकाळी ११ वा., याप्रमाणे दोन्ही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बावडा येथे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना महिलांना लाभ व्हावा, यासाठी जि. प. प्राथमिक शाळा बावडा, मारुती मंदीर गणेशवाडी, बागल फाटा प्राथमिक शाळा बावडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान बावडा, सावंत शेटे वस्ती जि. प. शाळा,आरगडे वस्ती बावडा, रत्नप्रभादेवी नगर जि.प.शाळा बावडा, घोगरे आवटे वस्ती बावडा या विविध ठिकाणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सदर योजनेचा शुभारंभ अंकिताताई पाटील ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे, अशी माहिती नीरा भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील यांनी दिली.
तसेच शेळगाव येथील वैदवाडी येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे माध्यमातून महालक्ष्मी मंदिरासमोर सभागृह बांधकामाचा भूमिपूजन समारंभ अंकिताताई पाटील ठाकरे व ग्रामस्थ शेळगाव यांचे उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. तरी वरील दोन्ही कार्यक्रमांना ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.