काँग्रेसच्या फुटलेल्या आमदारांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट.
राज्यात पुन्हा राजकीय भूकंप...?
मुंबई,दि.१६
विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील दहा मतं फुटल्यामुळे शेकापचे जयंत पाटलांचा पराभव झाला असं म्हटलं जात आहे. यातच फुटलेल्या आमदारांवर सहा वर्षांसाठी निलंबणाची कारवाई केली जाईल, असे संकेत महाराष्ट्र कॉंग्रेसने दिले आहे.
काँग्रेस पक्षाच्या फुटलेल्या आमदारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याची माहिती भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय. त्यामुळे राज्यात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
अलिकडेच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा एक उमेदवार पराभूत झाला. आता हा उमेदवार कुणामुळे पराभूत झाला. याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यावरून आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच कॉंग्रेसचे झिशान सिद्दीकी, सुलभा खोडके, हिरामण खोसकर, जितेंद्र अंतापूरकर यांनी महायुतीच्या उमेदवाराला मत दिल्याची चर्चा आहे. त्यांच्यावर कॉंग्रेस लवकरच कारवाई करणार असं समजलं जात आहे.
विधान परिषदेचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीतील फुटलेल्या आमदारांविषयी जास्तच बोललं जात आहे. अशातच या सर्व फुटलेल्या आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. जर पक्षांनी यांच्यावर कारवाई केली तर त्यांना आमच्या पक्षात स्थान दिलं पाहिजे की नाही ? यावर चर्चा झाली. तसेच सध्या महाविकास आघाडीत आलबेल नसल्याचंही सुधीर मुनंगटीवार यांनी सांगितलं आहे.